Jagdish Patil
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व मर्यादा सोडत काल विधानभवनाच्या लॉबीतच एकमेकांना जबर मारहाण केली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोपीचंद पडळकर नितीन देशमुखच्या दिशेनं सरसावले. त्यानंतर ऋषिकेश टकले आणि देशमुख यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
या सर्व घटनेनंतर पडळकरांनी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पडळकरांसाठी आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर धावून जाणाऱ्या ऋषिकेश टकलेची पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया.
मागील तीन ते चार वर्षांपासून ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा सोबत असतो.
मतदारसंघात फिरताना, सभा संमेलनात किंवा अधिवेशन काळात टकले हा पडळकरांसोबत सावलीसारखा असतो.
टकले हा पलूस तालुक्यातील माळवाडी गावचा रहिवासी असून त्याची स्वतःची हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना असून तो या संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा विनयभंग, मारामारी, शासकीय कामात अडथळा आणणं, अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत.