Jagdish Patil
महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत अशा गोपीनाथ मुंडेंचा राजकीय प्रवास कसा होता? ते जाणून घेऊया.
12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडेंचा जन्म झाला.
ABVP च्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
1982 साली त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती, तर अवघ्या 4 वर्षात ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले.
1980 ते 2009 या काळात त्यांनी 5 वेळा विधानसभेत आमदार म्हणून कामं केलं.
1992 ते 1995 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते तर 1995 च्या महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.
2009 मध्ये लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
2014 च्या बीड लोकसभा मतदारसंघातून ते मधून प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली.
तर 3 जून 2024 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं नवी दिल्लीत अपघाती निधन झालं.