Chetan Zadpe
मराठवाड्याच्या राजकारणात आणि एकूणच राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा दबदबा होता. मोठा जनाधार असल्याने त्यांना मासलीडर म्हंटले जायचे.
लोकसभेतील एका निवडणुकीत केलेल्या खर्चावरील वक्तव्यामुळे गोपीनाथ मुंडे अडचणीत आले होते.
गोपीनाथ मुंडे यांनी 2013 मध्ये मागील निवडणुकीत म्हणजेच 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 8 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले होते.
8 कोटींच्या खर्चाच्या दाव्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या.
8 कोटींच्या या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने गोपीनाथ मुंडे यांना खुलासा करण्यात यावा, असे निर्देश दिले गेले.
आपल्या या वक्तव्याबाबत त्यांना निवडणूक आयोगाकडे खुलासा करावा लागला. ते वक्तव्य म्हणजे केवळ शाब्दीक कोटी होती. त्यापलिकडे काही नाही, असे त्यांनी आयोगाला सांगितले.
मी वैयक्तिक 8 कोटी रुपये खर्च केलेले नाहीत. पक्षाने लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व मतदारसंघातून केलेल्या खर्चाचा तो आकडा होता, असे त्यांनी आयोगाला उत्तर दिले होते.