Pradeep Pendhare
मोदींनी 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण देण्याची घोषणेमुळे पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शिक्षण आणि तंत्रज्ञानात अभ्यास करणाऱ्या युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भरतेवर भर देताना, पुणे-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी हा राष्ट्रीय धोरणात्मक निर्णय ठरणार आहे.
एक-दोन वर्षांत 7 ते 8 सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याच्या दिशेने वाटचाल असून, हायटेक मॅन्युफॅक्चरिंग धोरणात महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञान उद्योगांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
मोदींनी भारतीय कंपन्या आणि MSME क्षेत्राने जागतिक बाजारपेठेत, मुक्त व्यापार करारांमुळे निर्यात संधींकडेही लक्ष वेधताना महाराष्ट्रातील लघु-मध्यम उद्योगांसाठी आर्थिक संदेश.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंगची घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.
मोदींनी संरक्षण उत्पादन आणि सायबर सुरक्षेला विशेष स्थान देताना, महाराष्ट्रातील संरक्षण उद्योग, उत्पादन युनिट्स आणि नागपूर-पुणे परिसरातील औद्योगिक क्षमतेकडे अप्रत्यक्ष लक्ष वेधले.
मोदींनी ‘शक्ती की सप्तधारा’ या विकास आराखड्यात कृषी आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्राला प्रमुख स्थान दिले. महाराष्ट्रासारख्या राज्यात कांदा, द्राक्षे, डाळिंब, सोयाबीन, ऊस यांसारख्या पिकांना फायद्याची ठरले.
मोदींनी ‘विकसित भारत’चा रोडमॅप दिला; पण महाराष्ट्रासाठी यातून किती रोजगार, किती उद्योग आणि किती नवे प्रकल्प येणार? आता खरी परीक्षा अंमलबजावणीची!
मोदींनी विकास, आत्मनिर्भरता अन् युवकांवर भर देतानाच, देशात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना, विकासाचा रोडमॅप आणि राजकीय संदेश, अशी दुहेरी धार दिसली.