Rashmi Mane
घराणेशाही नसतानाही कष्ट, संघर्ष आणि लोकसंपर्काच्या जोरावर गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
1970-80 च्या काळात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन आणि वंचित समाजात भाजप रुजवला. ही त्यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक कामगिरी होती.
मुंडे यांनी उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री अशी अनेक जबाबदारी पार पाडली. पण प्रत्येक पद त्यांनी मेहनतीने कमावलं, मिळवलं.
धनंजय मुंडे यांनी 2012 मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर थेट प्रश्न उपस्थित केले आणि संघर्ष उभा केला.
मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्या बंडाला वैयक्तिक न मानता संयमाने हाताळलं. टीका न करता पक्षाच्या संघटनावर लक्ष केंद्रित केलं. हे त्यांच्या मुत्सद्देगिरीचं उदाहरण ठरलं.
धनंजय मुंडेंच्या बंडानंतरही गोपीनाथ मुंडेंचं जनाधार वाढतच गेला. ग्रामीण महाराष्ट्रात भाजपला बळकटी दिली आणि पक्षाच्या राज्यातील यशात मोलाचा वाटा उचलला.
मोदी लाटेच्या काळात 2014 मध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं. गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद मिळालं ही त्यांच्या कारकिर्दीतील मोठी संधी होती.
3 जून 2014 रोजी एका अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. नेतृत्वाचा खरा अर्थ
नेतृत्व म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर संयम, दूरदृष्टी आणि नात्यांचा आदर. गोपीनाथ मुंडेंनी हे सर्व गुण दाखवून दिले – म्हणूनच ते आजही लोकांच्या मनात आहेत.