Pradeep Pendhare
पोलंडच्या अध्यक्षपदासाठी कॅरोल नाराॅकी आणि उदारमतवादी रफाल झाकोव्स्की यांच्यात लढत झाली.
उजव्या गटाचे कॅरोल यांना 50.89 टक्के, तर रफाल यांना 49.11 टक्के मतं मिळाली.
कलचाचणीत रफाल विजयी ठरतील, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी पराभव मान्य केला.
कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत पोलंडच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा मिळवला.
रशियाचे आक्रमक थांबवण्यासाठी कॅरोल हे युक्रेन मदतीचे समर्थन करतात.
कॅरोल हे रूढीवादी इतिहासकार आहेत.
शूटिंग रेंज आणि बॉक्सिंग रिंगमधील स्वतःचे व्हिडिओ पोस्ट करत कठोर माणूस म्हणून प्रतिमा उभी केली.
कॅरोल यांच्या राजकीय कारकीर्दीला लाॅ अँड जस्टिन पार्टीकडून सुरूवात झाली.
2015 ते 2023 या काळात हा पक्ष पोलंडमध्ये सत्तेत होता.