Ganesh Sonawane
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मैत्री झाली.
दोघांनी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. इथंच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली.
दोघेही भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवत यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन राजकारणात उतरले.
गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा महाजन यांच्याशी 21 मे 1978 रोजी विवाह केला.
वंजारी समाजातील हा कदाचित पहिलाच आंतरजातीय आणि सर्वात जास्त चर्चा झालेला विवाह असावा. पंकजा, प्रीतम व यशश्री या त्यांच्या तीन मुली.
3 मे 2006 रोजी प्रमोद महाजन यांचे निधन झाले. त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
3 जून 2014 रोजी, दिल्लीमध्ये कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला.
किती विलक्षण योगायोग ! – दोघांचं निधन ३ तारखेलाच झालं. एकाचे मे महिन्यात, दुसऱ्याचे जूनमध्ये.
महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीचा विषय निघाला की, महाजन-मुंडे यांची जोडी आजही आदर्श मानली जाते.