Ganesh Sonawane
दत्तात्रय विठोबा भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय भरणे आता राज्याचे कृषीमंत्री झाले आहेत.
'दत्ता मामा' किंवा भरणे 'मामा' कृषीमंत्री झाले अशी सगळीकडे चर्चा आहे.
पण दत्ता भरणे यांना 'मामा' का म्हणतात? त्यामागे एक छान स्टोरी आहे. जी त्यांनीच एकदा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली होती.
ते म्हणाले, 'माझ्या ज्या चुलत बहिणी आहेत, त्यांची मुलं ही माझ्यापेक्षा वयाने मोठी होती.
मी जेव्हा पुण्यात श्री शिवाजी मराठा हायस्कूलला शिकत होतो. त्यावेळी मी इयत्ता पाचवीत होतो. तेव्हा माझ्या चुलत बहिणीचा मुलगाही तिथेच इयत्ता दहावीत शिकत होता.
मी जरी वयाने लहान असलो तरी नात्याने त्याचा मामा होतो. म्हणून मी होस्टेलवर आलो की तो मला मामा म्हणायचा.
तो मला तेव्हापासून मामा म्हणत असल्याने आज मी सगळ्यांचा मामा झालो असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.