Rashmi Mane
गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसोहळ्यांचा माहोल आहे. आता लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही लग्नबंधनात अडकली आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत विवाह केला. दोघांच्या लग्नाचे सुंदर व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
विवाहासाठी तेजस्विनीने गुलाबी रंगाची आकर्षक नऊवारी साडी नेसली होती. तिच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हिडिओमध्ये तेजस्विनी आणि समाधान एकमेकांना हार घालताना दिसतात आणि दोघांच्या चेहऱ्यावरिल आनंद खूपच भरलेला आहे.
लग्नाचा मंडप हा फुलांच्या सुंदर सजावटीने सजवलेला हा मंडप अत्यंत देखणा दिसत होता. अतिशय कमालीचं सुंदर वातावरण पाहून सगळेच खूश झाले.
या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
तेजस्विनीच्या हळदी आणि मेंदी समारंभाचे फोटोदेखील प्रचंड पसंत केले जात आहेत.
तेजस्विनी आणि समाधान यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी साखरपुडा केला होता.