Rajanand More
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून विरोधकांवर तुटून पडणाऱ्या गौरव वल्लभ यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. आतापर्यंत भाजपवर जोरदार टीका करणारे गौरव आता जयजयकार करणार.
43 वर्षीय गौरव मूळचे जोधपूरचे. राजस्थान विद्यापीठातून पीएचडी. जमशेदपूरमध्ये प्रोफेसर म्हणून काम.
आर्थिक बाबींची चांगली जाण तसेच चांगले वक्ते म्हणून लोकप्रिय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले. पक्षाची ढाल म्हणून अनेक चर्चांमध्ये सहभाग. भाजपच्या नेत्यांना आणलं अडचणीत.
एका चर्चेदरम्यान एक ट्रिलियनमध्ये किती शून्य, असे पात्रांना विचारले. त्यांना उत्तर देता आले नाही. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.
झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरुद्ध 2019 मध्ये लढली विधानसभेची निवडणूक, पण पराभूत झाले.
सनातन विरोधी नारे देऊ शकत नाही. राम मंदिराबाबतची भूमिका पटली नसल्याचे सांगत पक्षाला सोडचिठ्ठी.
R