Rashmi Mane
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दाखल करण्यात आला.
नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता भव्य जाहीर सभा घेण्यात आली आहे.
या सभेला कार्यकर्ते व नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या जागेवर विजयी झाल्यानंतर नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले होते.
नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना असत्यावर सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे.
R