Budget 2026 : 'शाळा-महाविद्यालयात नवा ट्रेंड, अभ्यासाबरोबर आता 'रील्स'चे धडे'; विद्यार्थी शिकणार 'कंटेंट क्रिएशन'!

Aslam Shanedivan

केंद्र सरकार

केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी मोठी घोषणा करत आता शाळा-महाविद्यालयांत कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करणारी नवी योजना आणली आहे

government digital skills program | Sarkarnama

निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली असून २० लाख सोशल मीडिया व्यावसायिक घडविले जाणार आहेत.

government digital skills program | Sarkarnama

कंटेंट क्रिएटर

यासाठी देशातील १५ हजार माध्यमिक शाळांसह ५०० आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्यात येणार आहे.

government digital skills program | Sarkarnama

IICT

या सर्व प्रयोगशाळांचे काम आणि देखरेख ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) मार्फत केले जाणार असून सरकार थेट आर्थिक मदत करणार आहे

government digital skills program | Sarkarnama

काय शिकणार?

कंटेंट क्रिएटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ बनविण्यासह (कंटेंट क्रिएशन) अनेक तांत्रिक गोष्टींचे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

government digital skills program | Sarkarnama

व्हिडिओ आणि ऑडिओ

कंटेंट क्रिएटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार व्हिडिओ आणि ऑडिओ निर्मिती शिकवली जाईल

government digital skills program | Sarkarnama

ग्राफिक डिझाइन

कंटेंट क्रिएटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रभावी मांडणी, ग्राफिक डिझाइन आणि लेखन कौशल्य शिकवली जाणार आहेत

government digital skills program | Sarkarnama

डेटा अ‍ॅनालिटिक्स

कंटेंट क्रिएटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रेक्षकांची पसंती आणि ट्रेंड्सनुसार डिजिटल मार्केटिंग शिकवले जाईल

government digital skills program | Sarkarnama

योजनेचा उद्देश

अर्थमंत्र्यांच्या मते, भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया बाजारपेठांपैकी एक असून जागतिक स्तरावर कंटेंट हब म्हणून भारताला पुढे आणण्याचे लक्ष्य आहे

government digital skills program | Sarkarnama

Defence budget boost India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! संरक्षण बजेटमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'ची झलक...

आणखी पाहा