गरीब कुटुंबांसाठी 8 योजना; सरकारकडून पैसे, घर, गॅस आणि उपचार

Pradeep Pendhare

आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे स्वतःचे पक्के घर नसलेल्या गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांना याचा थेट लाभ मिळतो.

Schemes for Poor Families | Sarkarnama

लाखांत अनुदान

घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत थेट आर्थिक मदत मिळते, तर शहरी भागात गृहकर्जावर 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत व्याज अनुदान मिळते.

Schemes for Poor Families | Sarkarnama

मोफत सिलिंडर

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना लाकूड किंवा कोळशाच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी मोफत एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन आणि पहिला सिलेंडर मोफत दिला जातो.

Schemes for Poor Families | Sarkarnama

पाच लाखापर्यंत उपचार

आयुष्मान भारत योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. याद्वारे पात्र गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा मिळते.

Schemes for Poor Families | Sarkarnama

गरीब शेतकऱ्यांना निधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. हे पैसे वर्षातून तीन टप्प्यांत दिले जातात.

Schemes for Poor Families | Sarkarnama

मजुरांना पेन्शन योजना

प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना ही असंघटित क्षेत्रातील गरीब मजूर, घरकामगार आणि मजुरांसाठी वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर यामध्ये दरमहा 3000 पेन्शन दिली जाते.

Schemes for Poor Families | Sarkarnama

दोन लाखांचे विमा संरक्षण

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे 436 रुपयाच्या वार्षिक प्रीमियमवर गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांचे विमा संरक्षण दिले जाते.

Schemes for Poor Families | Sarkarnama

सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच 20 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर अपघात झाल्यास 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळते.

Schemes for Poor Families | Sarkarnama

NEXT : मुलगी आहे? या पाच सरकारी योजना नक्की जाणून घ्या...

येथे क्लिक करा :