Roshan More
सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
पुढील महिन्यात केवायसी नसलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, केवायसी संदर्भात वित्तविभागने परिपत्रक काढले आहे.
कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला दुबार वेतन दिले जाऊ नये यासाठी केवायसीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून भरली जाते, आणि त्यानुसार वेतन दिले जाते. यामध्ये बँक खाते, कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला असतो.
केवायसी करणे बंधनकारक आहे. ईकेवायसी पूर्ण न केल्यास संबंधितांना एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळणार नाही.
ईकेवायसी करताना आधारशी संलग्न असलेलेच बँक खाते देण्यात यावे, असे वित्त विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना स्वतःच ईकेवायसी पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.