Rashmi Mane
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये ऑक्टोबरपासून होणार डिजिटल.
Health Management Information System (HMIS) म्हणजे रुग्णाची माहिती संगणकीकृत पद्धतीने साठवणारी आधुनिक प्रणाली.
रुग्णाची नोंदणी झाल्यावर त्याला एक अद्वितीय ओळख क्रमांक दिला जाईल. भविष्यातील सर्व तपासण्या याच ID वर आधारित!
रुग्णाचे रक्त, एक्स-रे व इतर रिपोर्ट्स एका क्लिकवर पाहता येतील. वेळ वाचेल, निदान होईल अचूक!
राज्यातील 52 वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लागू केली जात आहे.
17 संस्थांमध्ये इंटरनेट सेवा सुरू, उर्वरित ठिकाणी जुलै 2025 पर्यंत सेवा पूर्ण.
या प्रकल्पाची जबाबदारी खासगी कंपनीऐवजी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडे – 269.50 कोटींचा खर्च.
पूर्वी लागणारा 10-12 मिनिटांचा वेळ आता 4-5 मिनिटांत रुग्ण व डॉक्टर दोघांसाठीही फायदेशीर.