Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना दणका!...तर थेट निलंबन?; सोशल मीडियासाठीची नियमावली वाचा!

Roshan More

राजकीय कमेंट्सवर पूर्ण बंदी!

सरकारी धोरणे, राजकीय घडामोडी किंवा सरकारच्या निर्णयांवर सोशल मीडियावर टीका किंवा प्रतिकूल टिप्पणी करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

Social Media | Sarkarnama

कडक कारवाई!

वैयक्तिक खात्यावर शासकीय पदनाम, गणवेश (वर्दी), सरकारी वाहने किंवा इमारतींचा वापर करून रिल्स, फोटो आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घातली आहे.

Social Media | Sarkarnama

द्वेषमूलक पोस्टवर थेट संक्रांत!

आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक किंवा समाजात तेढ निर्माण करणारा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड करणे महागात पडणार आहे.

Social Media Ban | Sarkarnama

गोपनीय कागदपत्रे

पूर्वमंजुरीशिवाय कोणतेही शासकीय गोपनीय दस्तऐवज, कागदपत्रे किंवा अंतर्गत माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास सक्त मनाई आहे.

Social Media | Sarkarnama

स्वतःची टिमकी वाजवणे बंद!

कार्यालयीन काम करताना स्वतःची 'स्वयंप्रशंसा' होईल असा मजकूर किंवा व्हिडिओ पोस्ट न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Social Media | Sarkarnama

सर्वांनाच नियम लागू!

हे नियम केवळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांनाच नाही, तर कंत्राटी कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी आणि महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक आहेत.

Sarkarnama

व्हॉट्सॲपला मुभा

योजनांच्या प्रचारासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरास परवानगी आहे; मात्र शासनाने बंदी घातलेल्या कोणत्याही ॲपचा वापर करता येणार नाही.

Army And Social Media | Sarkarnama

थेट शिस्तभंग!

महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे निलंबणाची टांगती तलवार त्यांच्यावर असेल.

Social Media | Sarkarnama

NEXT : PM मोदींच्या टास्क फोर्समध्ये गोमूत्र तज्ज्ञ! प्रियांका गांधींनी लोकसभेत कुणाची उडविली खिल्ली?

Priyanka Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा