Rashmi Mane
नॅशनल अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक (नाबार्ड)मध्ये बँक मेडिकल ऑफिसर (BMO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या वैद्यकीय उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना 8 ऑगस्ट 2028 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असावी. तसेच जनरल मेडिसिनमधील पोस्ट ग्रॅज्युएशन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 70 वर्षे ठेवण्यात आली असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. मात्र अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. इच्छुकांनी अधिकृत वेबसाईट nabard.org वर उपलब्ध अधिसूचना वाचून अर्ज डाउनलोड करून भरावा.
या भरतीसाठी संधीचा फायदा घेऊन, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीपूर्वी आपले अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी nabard.org या वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज लवकर पाठवा, संधी गमावू नका!