Aslam Shanedivan
राज्यात नुकताच मराठी हिंदी असा वाद पाहायला मिळाला होता. ज्यावरून ठाकरे बंधुंनी महायुती सरकारला घेरलं होतं.
यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीसह त्रिभाषाचा निर्णय मागे घेतला. याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
यानंतर आता जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कार कंपनीने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांचे मन जिंकणारे काम केलं आहे.
टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू करण्यात आलं असून कंपनीने शोरुमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत टेस्ला असं लिहिलं आहे.
जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या टेस्लाच्या या कृतीचे सोशल मिडीयामध्ये खूप कौतुक होत आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि अमेरिकेन मॉडेल असलेल्या टेस्ला कंपनीचे मुंबईत शोअरूम बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज या शोरुमचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी कारची पाहणी देखील केली.
टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून सुरु होणार असून येथे संपूर्ण मेकॅनिझम आणि सर्व्हिसिंग सेंटर असणार आहे
तसेच आता टेस्लासाठी मुंबईत चार मोठे चार्जिंग स्टेशन आणि 32 चार्जिंग इंफ्रास्टक्चरची निर्मिती केली जाणार आहे. टेस्ला ही 600 किमी चालणारी गाडी आहे.
इलॉन मस्कची टेस्ला भारतात, फडणवीसांनी केलं उद्घाटन : कारची किंमत अन् वैशिष्ट्य काय?