Rashmi Mane
आयटी आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या NIELIT संस्थेमार्फत प्रोजेक्ट इंजिनिअर (IT) आणि रिसोर्स पर्सन (फायनान्स) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट ऑफलाइन मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते.
या भरतीअंतर्गत एकूण 3 रिक्त पदे उपलब्ध आहेत. यामध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर (IT) आणि रिसोर्स पर्सन (फायनान्स) या पदांचा समावेश आहे. आयटी क्षेत्रातील फ्रेशर्सनाही अर्ज करता येणार आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE, BTech किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे. VLSI, IoT, Embedded Systems, IT Technology तसेच C, C++ आणि Python यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे.
B.Com किंवा M.Com पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. Tally, करप्रणाली, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील ज्ञान आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
उमेदवारांचे कमाल वय 32 वर्षे असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000 पर्यंत वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण हैदराबाद असेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2026 आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 10 आणि 11 जुलै 2026 रोजी हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी NIELIT च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती विभागातील संबंधित जाहिरात उघडावी. त्यानंतर ऑनलाइन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरून रिझ्युमे अपलोड करावा. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.