Rashmi Mane
थोडासा पाऊस आला नाही की लगेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र यामागे काही महत्त्वाची तांत्रिक कारणे देखील आहेत. जाणून घ्या घेऊया या स्टोरीमध्ये..
पावसासोबत येणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या वायरवर पडतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो आणि सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद केला जातो.
सततच्या होणाऱ्या पावसामुळे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणांमध्ये ओल निर्माण होते. यामुळे बिघाड होण्याची शक्यता वाढते.
अतिवृष्टीमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी जाणे किंवा तांत्रिक दोष निर्माण होणे सामान्य आहे. अशा वेळी मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.
पावसामुळे तारांवर पाणी साचल्यास किंवा वायरमध्ये संपर्क झाल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा काही वेळा पूरता बंद केला जातो.
अनेक वेळा यंत्रणेत मोठा बिघाड नसतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी वीज कंपन्या खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करतात.
काही भागांतील जुने खांब, तारा आणि उपकरणे पावसाळ्यात संवेदनशील बनतात. त्यामुळे किरकोळ पावसातही वीज खंडित होण्याच्या घटना वाढतात.