Rashmi Mane
‘विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY)’ ही देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने मोठी संधी ठरणार आहे.
या योजनेत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाला केंद्र सरकारकडून थेट 15,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टला मोदींनी या योजनेची घोषणी केली होती.
पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनाशी निगडित असलेली ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2017 या कालावधीत निर्माण होणाऱ्या नव्या नोकऱ्यांसाठी लागू असेल.
या योजनेतून तब्बल एक कोटी 92 लाख तरुणांना रोजगाराचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यामधील बहुसंख्य लाभार्थी हे पहिल्यांदाच नोकरी करणारे असतील.
खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाला केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांची मदत दिली जाईल. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये वितरित होईल.
सलग 6 महिने नोकरी पूर्ण केल्यानंतर पहिला हप्ता म्हणजे 7500 रुपये थेट तरुणांच्या ‘ईपीएफओ’ खात्यात जमा होईल. त्यानंतर नोकरीला 12 महिने पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता म्हणजे उर्वरित 7,500 रुपये मिळतील.
या योजनेमुळे तरुणांना आर्थिक फायदा होईलच पण रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि खासगी क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील.