Rashmi Mane
सरकारी योजनांसाठी अर्ज करूनही तो वारंवार रिजेक्ट होतोय? मग अर्जातील काही चुका याला कारणीभूत असू शकतात. अर्ज नाकारला जाण्यामागची कारणे आणि उपाय जाणून घ्या.
आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला यातील माहिती जुळत नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. अर्जासोबत योग्य आणि स्पष्ट कागदपत्रे जोडा.
आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव वेगळे असल्यास पडताळणी अडकू शकते. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांवरील नाव तपासा.
बँक खाते बंद असल्यास, आधार लिंक नसल्यास किंवा DBT सुविधा सुरू नसल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.
प्रत्येक सरकारी योजनेसाठी उत्पन्न, वय, रहिवास आणि इतर अटी असतात. या अटी पूर्ण होत नसल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
अर्ज भरताना चुकीचा मोबाईल नंबर, पत्ता किंवा बँक तपशील दिल्यास अर्ज अडकू शकतो. सबमिट करण्यापूर्वी माहिती तपासा.
अर्जाचा स्टेटस तपासा आणि रिजेक्शनचे कारण जाणून घ्या. संबंधित विभागाच्या कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.
चुका दुरुस्त करून आवश्यक कागदपत्रांसह पुन्हा अर्ज करा. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. कोणालाही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका!