घरातील व्यक्तीने मृत्यूपत्र केलं नाही अन् अचानक काही घडलं... तर बँक खात्यातले पैसे अन् घर कुणाला मिळतं?

Rashmi Mane

कुणाला मिळते संपत्ती?

घरातील कर्त्या व्यक्तीचं अचानक निधन झालं आणि मृत्यूपत्रही नसेल, तर घर, जमीन आणि बँकेतील पैसे कुणाच्या वाट्याला येतात? यासाठी कायद्यात स्पष्ट नियम आहेत.

Women Property Benefits,

मृत्यूपत्राशिवाय...

मृत्यूपत्र न करता व्यक्तीचं निधन झाल्यास त्याला 'मृत्यूपत्राशिवाय वारसा' (Intestate Succession) म्हणतात. अशावेळी वारसाहक्कानुसार संपत्तीचं वाटप होतं.

हिंदू वारसा कायदा काय सांगतो?

हिंदू पुरुषाच्या संपत्तीचं वाटप हिंदू वारसा कायदा 1956 नुसार केलं जातं. यामध्ये प्रथम श्रेणीतील वारसांना प्राधान्य दिलं जातं.

कोणाला हक्क?

मृत व्यक्तीची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई हे प्रथम श्रेणीतील वारस आहेत. त्यांना कायद्यानुसार समान वाटा मिळतो.

समजून घ्या

समजा कर्त्या व्यक्तीच निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई आहेत. तर संपत्तीचे चार समान हिस्से होतील.

मुलगीही संपत्तीची समान वारसदार

वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क मुलाप्रमाणेच असतो. लग्न झालं असलं तरी मुलीचा वारसाहक्क संपत नाही.

बँकेतील पैशांचं काय होतं?

मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कमही वारसाहक्काच्या नियमांनुसार मिळू शकते. यासाठी बँकेत मृत्यू प्रमाणपत्र आणि आवश्यक वारस कागदपत्रे सादर करावी लागतात.

मृत्यूपत्र केल्यास वाद टाळता येतात!

वैध मृत्यूपत्र असल्यास त्यातील तरतुदींनुसार संपत्तीचं वाटप होऊ शकतं. त्यामुळे भविष्यातील कौटुंबिक वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करणं महत्त्वाचं आहे.

Next : उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

येथे क्लिक करा