Pradeep Pendhare
सरकारी योजनांच्या अटी वेगवेगळ्या असल्या, तरी एकाच घरातील पात्र व्यक्ती विविध केंद्र व राज्य योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकतात.
आयुष्मान भारत योजनेचा संपूर्ण लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. वर्षाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मोफत वा सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते.
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे पक्के घर नसलेल्या पात्र कुटुंबास घर बांधणीसाठी आर्थिक अनुदान मिळते.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे पात्र कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळते.
प्रधानमंत्री सौभाग्य योजनेद्वारे मोफत किंवा सवलतीत वीज जोडणी दिली जाते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळू शकते.
सुकन्या समृद्धी योजनेत देखील घरातील मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ मिळता येऊ शकतो.