Deepak Kulkarni
अयोध्यातील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून भाजपकडून वातावरण निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
राम मंदिराचा सोहळ्याचा भाजप राजकीय इव्हेंट करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मासांहारी होते असे विधान करून खळबळ उडवली.
याचवेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले.
श्रीरामांचा मुद्दा राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आला असताना राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेत.
विशेष म्हणजे त्यांच्या दौऱ्याची सुरुवातच शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिर दर्शनाने झाली.
श्री काळाराम मंदिरात महापूजेवेळी भारतातील महाराष्ट्रातील शेतकरी,जनता सुखी होवोत असे साकडे राज्यपाल रमेश बैस यांनी घातले.
वास्तविक राज्यपालांचे दौरे राजकीय नसतात. मात्र, कावळा उडण्याचा आणि फांदी तुटण्याच्या योगायोगापासून राजकीय पक्ष दूर राहतीलच कसे?
देव निंदा कायदा करण्यात यावा, आव्हाडांविरोधात कारवाई करण्यात यावी याकरिता तत्काळ राज्य सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी महंत सुधीरदास महाराज यांनी यावेळी केली. (फोटो सौजन्य : अरविंद जाधव)