Deepak Kulkarni
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली आहे.
या छापेमारीनंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवार समर्थपणे किल्ला लढवत आहे.
रोहित पवारांच्या निशाण्यावर कायमच भाजप,शिंदे गटासह अजित पवार गट राहिला आहे.
भाजपच्या राम शिंदेंना पराभवाचा धक्का देत कर्जत जामखेडचे आमदार झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच सक्रीय राहिलेले आहेत.
पवार कुटुंबाची तिसरी पिढी आणि प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेल्या रोहित यांच्याकडे राज्यातील युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित यांचं आतापर्यंतचं काम हे उल्लेखनीय राहिले आहे.
घरची परिस्थिती पाहता त्यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य होतं. मात्र, त्यांचं पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झालं.
रोहित पवारांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला अन् अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रोचा पदभार स्वीकारला.
व्यवसायात घट्ट पाय रोवल्यानंतर त्यांनी राजकारणात आत्तापर्यंत जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकी अशी मजल मारली आहे. तसेच ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत.