Mayur Ratnaparkhe
वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गोविंद मोहन हे विद्यमान गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची जागा घेतील.
गोविंद हे सध्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आहेत.
ते गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यभार स्वीकारतील.
जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोहन यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
मोहनने BHU मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे.
ऑक्टोबर 2021 पासून त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक सचिव म्हणून काम केले आहे.
यापूर्वीही त्यांनी दोनदा गृहमंत्रालयात काम केले आहे.