शिंदेंच्या आमदाराने आक्षेप घेतलेल्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांची हिस्ट्री काय ?

Jagdish Patil

'शिवाजी कोण होता?'

दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून नवा वाद सुरू झाला आहे.

Shivaji Kon Hota Controversy

संजय गायकवाड

शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे.

Sanjay Gaikwad Controversy

गोविंद पानसरे

या वादामुळे पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे चर्चेत आले असून त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Govind Pansare Biography

कोण होते पानसरे?

ज्येष्ठ कामगार नेते, कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक अशी कॉ. गोविंद पानसरे यांची ओळख आहे.

Govind Pansare | Sarkarnama

कोल्हापूर

ते अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावातून कोल्हापुरात शिक्षणासाठी आले.

Govind Pansare Biography

पेपर

कोल्हापुरात आल्यानंतर शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून त्यांनी सुरुवातीला पेपर विकण्याचं काम केलं.

Govind Pansare Biography

प्राध्यापक

इथेच त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. तसंच शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे.

Govind Pansare | Sarkarnama

कम्युनिस्ट

ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात विविध पदांवर कार्यरत होते. तसंच ते कामगार, शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय असायचे.

Govind Pansare | Sarkarnama

शिवाजी महाराज

पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिलं.

Shivaji Kon Hota Controversy

वाद

त्यांचं पुस्तक अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. पुस्तकात शिवरायांचा उल्लेख एकेरी असल्याचा आक्षेप घेतला जातो.

Shivaji Kon Hota Controversy

गोळीबार

दरम्यान, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर गोळीबार झाला.

Govind Pansare Biography | Sarkarnama

निधन

या हल्ल्यातून उमाताई बचावल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरेंचं उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 मुंबईत निधन झालं.

Govind Pansare Biography | Sarkarnama

NEXT : टिम कुक यांनी दिला अ‍ॅपलच्या CEO पदाचा राजीनामा; 'जगातील सर्वोत्तम नोकरी सोडतोय' म्हणत केली नव्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा...

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama
क्लिक करा