PM Internship 2024 : काय आहे पीएम इंटर्नशिप योजना, कोण करू शकतो अर्ज?

Rashmi Mane

तुम्ही इंटर्नशिपसाठी चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तरुणांना पीएम इंटर्नशिप योजना (पीएम इंटर्नशिप योजना 2024) द्वारे देशातील मोठ्या आणि नामांकित कंपन्यांकडून काम करण्याची आणि शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

PM Internship 2024 | Sarkarnama

केंद्र सरकारने ही पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरु केली असून ज्यामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणार आहे.

PM Internship 2024 | Sarkarnama

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची घोषणा केली होती.

PM Internship 2024 | Sarkarnama

या पोर्टलवर देशातील टॉप 500 कंपन्या त्यांच्या इंटर्नशिपची माहिती देणार आहेत.

PM Internship 2024 | Sarkarnama

Tata Consultancy, Wipro, Reliance, TCS, Tech Mahindra, Titan, Bajaj सारख्या कंपन्यांनी इंटर्नशिप ऑफर दिल्या आहेत. ज्यासाठी PM इंटर्नशिप पोर्टलवर 12 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होत आहे.

PM Internship 2024

या इंटर्नशिपमध्ये, उमेदवार बँकिंग, ऑईल, उत्पादन यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या पात्रता आणि इच्छेनुसार इंटर्नशिपसाठी फॉर्म भरू शकतात

PM Internship 2024

इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाइन आणि डिस्टन्स मोडद्वारे अभ्यास करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे ते देखील नोंदणी करू शकतात.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

Next : श्वानप्रेमामुळे रतन टाटांचा विश्वास जिंकणारा 'युवा मित्र' शांतनू नायडू कोण ?

येथे क्लिक करा