Jagdish Patil
रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. त्यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा कमी वयाचा आणि अत्यंत जवळचा मित्र शांतनू नायडू चर्चेत आला आहे.
रतन टाटांचा स्वीय सहाय्यक म्हणून तो कार्यरत होता. या दोघांमधील मैत्रीला त्याचं श्वानांवर असलेलं प्रेम कारणीभूत ठरलं आहे.
पुण्यातील तेलुगू कुटुंबात जन्मलेला शांतनूने पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंग आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून MBA केलं आहे.
टाटा एल्क्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली.
भटक्या श्वानांसाठी बनवलेल्या एका डिव्हाईसमुळे त्याची रतन टाटांशी भेट झाली.
वाहनांखाली सापडून मरण पावणाऱ्या भटक्या श्वानांना वाचवण्यासाठी त्याने 'कॉलर रिफलेक्टर' तयार केला.
शांतनूने भटक्या श्वानांसाठी केलेलं हे काम पाहून रतन टाटा प्रभावित झाले.
यानंतर टाटांनी स्वतः फोन करून त्याला सोबत काम करण्याची ऑफर दिली अन् इथूनच दोघांमधील मैत्रीलाही सुरूवात झाली.