Govt Job : इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! 'या' सरकारी कंपनीत थेट नोकरी, पगार तब्बल 1 लाख 40 हजार!

Rashmi Mane

इंजिनियरसाठी आनंदाची बातमी

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

BHEL Recruitment | Sarkarnama

'भेल'मध्ये भरती

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या प्रतिष्ठित सरकारी उपक्रमामध्ये प्रोबेशनरी इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

BHEL Recruitment | Sarkarnama

मोठी भरती

या भरतीअंतर्गत एकूण 340 पदे भरली जाणार असून अर्ज प्रक्रिया 24 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झाली आहे.

BHEL Recruitment | Sarkarnama

ऑनलाइन अर्ज

उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

BHEL Recruitment | Sarkarnama

उमेदवारांना संधी

या भरतीत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, आणि इलेक्ट्रिकल या शाखांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे. सर्वाधिक पदे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पदासाठी एकूण 175 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

BHEL Recruitment | Sarkarnama

पात्रता

पात्रतेसाठी उमेदवारांनी बी.ई./बी.टेक./बीएससी (इंजिनियरिंग) पदवी प्राप्त केलेली असावी. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या शाखांतील उमेदवार अर्जासाठी पात्र आहेत.

BHEL Recruitment | Sarkarnama

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 25 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

BHEL Recruitment | Sarkarnama

भत्त्यांचा लाभ

निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40.000 इतका मासिक पगार मिळणार आहे, तसेच भारत सरकारच्या मान्यताप्राप्त सर्व भत्त्यांचा लाभही दिला जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना 1,180 इतके शुल्क भरावे लागेल.

Job Interview | Sarkarnama

Next : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने बदलले ग्रॅच्युइटीचे नियम! 

येथे क्लिक करा