Roshan More
पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेले जांभळ्या रंगाचेच स्केच पेन वापरा. अन्य पेन किंवा पेन्सिल वापरल्यास मत बाद होईल.
तुमच्या आवडत्या एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ हा आकडा लिहा. पहिली पसंती न नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरते.
'१' हा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर लिहू नका. एकाच उमेदवाराला पहिली पसंती देणे आवश्यक आहे.
इतर उमेदवारांना पसंतीनुसार २, ३, ४ असे आकडे देऊ शकता. इतर पसंतीक्रम देणे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
पसंतीक्रम दर्शवण्यासाठी १, २, ३ असे आकडे वापरा (देवनागरी, इंग्रजी किंवा रोमन). 'एक', 'दोन' असे शब्दात लिहू नका.
उमेदवाराच्या नावासमोर ✓ (बरोबर) किंवा X (चूक) अशी खूण करू नका. असे केल्यास मतदान बाद होईल.
मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, स्वाक्षरी, आद्याक्षरे किंवा अंगठ्याचा ठसा उमटवू नका. यामुळे मतपत्रिका अवैध ठरते.
आकडा नक्की कोणत्या उमेदवाराच्या नावासमोर आहे याबाबत कोणतीही शंका राहू देऊ नका. स्पष्ट व सुटसुटीत आकडे लिहा.