SIR नंतर मतदार यादीत नाव नाही? Form 6 असा भरा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pradeep Pendhare

SIR नंतर मतदार नाही?

घाबरू नका! आधी नाव का दिसत नाही हे तपासा आणि पात्र असल्यास Form 6 द्वारे नोंदणीची प्रक्रिया जाणून घ्या.

Form 6 | Sarkarnama

SIR नंतर नाव दिसत नाही

SIR प्रक्रियेत Enumeration Form न मिळणे/गोळा न होणे, मतदार अनुपस्थित असणे, स्थलांतरित झाल्याची नोंद, मृत्यू किंवा दुबार नोंद अशा कारणांमुळे नाव दिसत नाही.

Form 6 | Sarkarnama

सर्वात आधी हे करा!

नाव शोधण्यासाठी EPIC नंबर, नाव, मोबाइल नंबर किंवा उपलब्ध इतर तपशीलांचा वापर करता येतो. महाराष्ट्रात नाव शोधण्याची सुविधा अधिक सुलभ करण्यात आली आहे.

Form 6 | Sarkarnama

Form 6 नेमका काय?

ECI च्या अधिकृत माहितीनुसार General Voter म्हणून नोंदणी करण्यासाठी Form 6 वापरला जातो. पात्र भारतीय नागरिक ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

Form 6 | Sarkarnama

SIR अन् Form 6चा संबंध?

महाराष्ट्र CEO कार्यालयाच्या माहितीनुसार, वगळलेल्या मतदारांना मतदारयादीत नोंदणीसाठी Form 6 सादर करता येतो.

Form 6 | Sarkarnama

कोण Form 6 भरू शकतो?

ECI नुसार, भारतीय नागरिक असणे आवश्यक, पात्र वय पूर्ण झालेले असणे, संबंधित मतदारसंघात ordinarily resident असणे, मतदार म्हणून अपात्र नसणे.

Form 6 | Sarkarnama

चार तारखा महत्त्वाच्या

2026 च्या पुनरिक्षणासाठी ECI ने पात्रता तारखा 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर, अशा चार तारखा दिल्या आहेत.

Form 6 | Sarkarnama

Form 6 भरताना काय लागेल?

पूर्ण नाव, नातेवाईकाचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, पत्ता, वयाचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, फोटोसह Form 6 मध्ये जन्मतारीख आणि रहिवासासाठी संबंधित कागदपत्रे महत्त्वाची ठरतात.

Form 6 | Sarkarnama

कोणती कागदपत्रे चालतात?

वयाचा, रहिवाशी दाखला, जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, दहा-बारावीचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट ही कागदपत्रे चालतात.

Form 6 | Sarkarnama

Form 6 ऑनलाइन?

ECI नुसार मतदारांना ऑनलाइन Form 6 भरता येतो. ऑफलाइन अर्जासाठी निवडणूक शाखेत, बूथ अधिकारी, सहायक बूथ अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो.

Form 6 | Sarkarnama

अर्ज केल्यानंतर काय?

Form 6 भरल्यानंतर ECI नागरिकांना मतदार नोंदणीची स्थिती तपासण्याची सुविधा देते. मदतीसाठी 1950 मतदान हेल्पलाइन देखील उपलब्ध आहे. मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे.

Form 6 | Sarkarnama

NEXT : दुष्काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचा पैसा कसा मिळतो?

येथे क्लिक करा :