Rashmi Mane
पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा विचार आहे? मग उमेदवारासाठी नेमक्या कोणत्या अटी आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार स्वतः पदवीधर असणं बंधनकारक नाही.
शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने स्वतः शिक्षक असणं आवश्यक नाही. ‘शिक्षक’ ही मतदारांची ओळख आहे.
‘पदवीधर’ आणि ‘शिक्षक’ ही ओळख संबंधित मतदारसंघातील मतदारांच्या पात्रतेशी जोडलेली आहे. उमेदवाराच्या पात्रतेशी त्याचा थेट संबंध नाही.
विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय किमान ३० वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवार भारतीय नागरिक असावा. तसेच निवडणुकीसाठी लागू असलेल्या कायदेशीर पात्रता आणि अटी पूर्ण करणं आवश्यक आहे.
उमेदवाराचं नाव संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत असणं आवश्यक आहे. इतर कायदेशीर अटीही लागू होतात.
म्हणजेच, 30 वर्षे पूर्ण केलेला पात्र भारतीय नागरिक पदवीधर नसतानाही पदवीधर मतदारसंघातून, आणि शिक्षक नसतानाही शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो.