Jagdish Patil
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
त्यांच्या सहकाऱ्यांनी ते निवडणूक आयोगात मनमानी कारभार करत असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
याच मुद्द्यावरून विरोधकांनी कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच निमित्ताने ज्ञानेश कुमार यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
ज्ञानेश कुमार हे 1988च्या तुकडीतील केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत.
त्यांनी लखनौतील कॉल्विन तालुकदार्स कॉलेजमधील शिक्षणानंतर IIT कानपूरमधून त्यांनी सिव्हील इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरणीय अर्थशास्त्राचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी जिल्हाधिकारी ते केंद्र सरकारमधील सचिव अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
निवडणूक आयोगात नियुक्ती होण्यापूर्वी ज्ञानेश कुमार यांनी नव्याने स्थापन झालेल्या अमित शाह यांच्या सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे.
जानेवारी 2024 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.