Mayur Ratnaparkhe
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कुणाल सिंह चौहान याचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.
कुणाल सिंह चौहान याने रिद्धी जैन हिच्याशी लग्न करून वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे
कुणाल सिंह चौहान आणि रिद्धी जैन यांनी अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेत विवाह केला.
एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधल्यावर नववधू आणि वर दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
या थाटामाटातील विवाह सोहळ्यास दोन्ही बाजूंचे आप्तस्वकीय आशीर्वाद देण्यास हजर होते.
मुलाचा विवाह सोहळा अगदी रीतीरिवाजानुसार आणि थाटामाटात पार पडताना पाहून शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावरही समाधान होते.
वृक्षारोपण
शिवराज सिंह यांनी आपल्या मुलास आणि सूनेस त्यांच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.mj
विवाहासाठी वधू-वराने सुंदर अशा पोशाख परिधान केला होता, त्यामुळे दोघेही अधिकच उठून दिसत होते.