Roshan More
सी वोटरने मूड ऑफ नेशन सर्व्हे केला आहे. 2 जनवरी से 9 फरवरी 2025 या काळात केलेल्या सर्व्हेत लोकांनी पुढील पंतप्रधान कोण असावा, पुन्हा कोणाचे सरकार हवे, मोदी सरकारची कामगिरी कशी यावर उत्तरे दिली आहेत.
आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून 51.2 टक्के लोकांनी पसंती दिली. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 24.9 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदावर कोण हवे, या प्रश्नावर लोकांनी दिलेल्या मतानुसार गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ यांच्यात काटे की टक्कर दिसते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना 5.5 टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पुढील पंतप्रधान म्हणून 3.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
मोदींच्या नंतर पुढील पंतप्रधान म्हणून योगी आदित्यनाथ यांना 25.3% लोकांनी पसंती दर्शवली आहे.
अमित शाह यांना पुढील पंतप्रधान म्हणून 26.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे अवघ्या योगींपेक्षा अमित शाह हे पंतप्रधाच्या रेसमुध्ये अवघ्या एक टक्क्याने पुढे असल्याचे दिसते.
पुढील पंतप्रधान म्हणून अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर नितीन गडकरी यांना पसंती दर्शवण्यात आली आहे. तब्बल 14.6 टक्के लोकांनी गडकरींना पुढील पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली आहे.