Rajanand More
आयएएस अप्रित सागर यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सध्या जिल्हाधिकारी असलेल्या अर्पित यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्यातील एका अधिकाऱ्याचं दंड ठोठावला आहे.
अप्रित सागर या गुजरातमधील महीसागर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 म्हणजेच अहमदाबाद-गोध्रा मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याच्या तक्रारी होत्या. रस्त्याच्या स्थितीमुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
हा मार्ग अर्पित यांच्याच जिह्यातून जात असल्याने त्यांनी गडकरींच्या मंत्रालयांतर्गत येत असलेल्या ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्याला आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.
रस्ता सुरक्षा समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला 18 जून ते 7 जुलै या कालावधीसाठी प्रतिदिन 500 रुपयांचा दंड केला आहे.
महामार्गावरील खड्ड्यांसाठी थेट ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्याला दंड करणाऱ्या अर्पित सागर या गुजरातमधील पहिल्या अधिकारी असल्याची चर्चा आहे.
मुळच्या उत्तर प्रदेशच्या अर्पित सागर या 10 वर्षांपासून प्रसासकीय सेवेत आहेत. जिल्हाधिकारी होण्यापूर्वी त्या वडोदरा महापालिकेत उपायुक्त होत्या.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्पित यांना उत्कृष्ट जिल्हा विकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. वलसाड येथे त्यांची पोस्टिंग होती.