Rajanand More
महाराष्ट्रातील 7 जणांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. एकाच दिवशी हे सर्वजण निवृत्त होतील. त्यांच्यापैकी किती जण पुन्हा राज्यसभेत जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही कार्यकाळ संपत आहे. ते पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढण्याबाबत संभ्रम आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही निवृत्त होत आहेत. ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही भाजपचे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. त्यांची पुन्हा राज्यसभेत वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची निवृत्तीही जवळ आली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यसभेत पाठविण्यात आले होते.
दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील यांची सप्टेंबर 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली होती. त्याही एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान याही निवृत्त होत असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही.
पाटील हे भाजपचे सदस्य असून त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळही मिळत नाही. ऑगस्ट 2024 मध्ये ते राज्यसभेवर गेले आहेत.