सरकारनामा ब्यूरो
IAS अधिकारी विशाल धाकड हे मूळचे राजस्थानचे आहेत.
मोटर मेकॅनिक वडिलांचा मोटर वायडिंगचा व्यवसाय आहे.
IAS अधिकारी व्हायचं हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं.
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशाल यांनी अथक परिश्रम घेत परीक्षा उत्तीर्ण केली.
2021 मध्ये यूपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात 39 वी रँक मिळवत ते परीक्षेत उत्तीर्ण झाले.
दिल्ली येथे त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
विशाल हे लहानपणापासून मेहनती आणि अभ्यासू आहेत.
विशाल यांना फिरायला आणि फॅशनेबल राहायला आवडते.
विशाल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून फोटो शेअर करत आपले अपडेट देत राहतात.