Gungi Gudiya : देशाच्या राजकारणात 'गुंगी गुडिया' हा शब्द नेमका आला कुठून?

Rajanand More

गुंगी गुडिया

देशाच्या राजकारणात 'गुंगी गुडिया' या शब्दामागे मोठा इतिहास दडला आहे. हा काळ नेहरू-गांधी कुटुंबाच्या देशातील वर्चस्वाला हादरा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातब्बर समाजवादी नेत्यांचा होता.

Indira Gandhi | Sarkarnama

इंदिरा गांधी

गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग पहिल्यांदा इंदिरा गांधी यांच्यासाठी करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्या पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होत्या.

Indira Gandhi | Sarkarnama

काय आहे इतिहास?

पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी सुरुवातीला सहजपणे संवाद साधत नव्हत्या. भाषण करताना किंवा संसदेत त्या फारशा बोलत नसत. त्या बोलणे टाळायच्या, असे सांगितले जाते.

Indira Gandhi | Sarkarnama

शब्द फुटत नव्हते

इंदिरा गांधी यांचे खासगी डॉक्टर डॉ. के. पी. माथुर यांनी आपल्या ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या पुस्तकात एक किस्सा लिहिला आहे. १९६९ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, असे पुस्तकात म्हटले आहे.

Indira Gandhi | Sarkarnama

तणावाखाली

पंतप्रधान झाल्यानंतर सुरूवातीची एक-दोन वर्षे इंदिरा गांधी तणावाखाली असायच्या. काहीवेळा भाषण द्यावे लागणार असलेल्या कार्यक्रमांमध्ये जाणेही त्या टाळायच्या, असेही पुस्तकात म्हटले आहे.

Indira Gandhi | Sarkarnama

कोण म्हणाले गुंगी गुडिया?

इंदिरा गांधी यांच्या या स्वभावामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका व्हायची. याच काळात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी त्यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटले होते. देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच महिला नेत्याविषयी असा शब्दप्रयोग झाला होता.

Dr. Ram Manohar Lohia | Sarkarnama

गुंगी गुडिया ते आयर्न लेडी

पंतप्रधानपदी असताना गुंगी गुडिया ते आयर्न लेडी असा इंदिरा गांधीचा प्रवास झाला. आपल्या कार्यकाळात त्यांनी कणखर पंतप्रधान म्हणून जगात आपली ओळख निर्माण केली.

Indira Gandhi | Sarkarnama

पाकिस्तानचे दोन तुकडे

इंडिया गांधी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानचे दोन तुकडे आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती. अमेरिकेसारख्या महाशक्तीचा दबाव इंदिरा गांधी यांनी त्यावेळी झुगारून लावला होता.

Indira Gandhi | Sarkarnama

NEXT : कायदेशीर लढ्यानंतर अखेर दीड वर्षांसाठी मिळाली आमदारकी; कोण आहेत काँग्रेसच्या 'या' महिला नेत्या?

येथे क्लिक करा.