Rajanand More
राजकारणात अनेक गुरु-शिष्य असतील. पण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींची कहाणी काहीशी हटके आहे.
गुजरातमधील निवडणुकीत पराभवानंतर आरएसएसमध्ये सक्रीय असलेल्या मोदींना अडवाणींना 80 च्या दशकात राजकारणात आणले.
अयोध्या राम मंदिरासाठी अडवाणींनी 1990 मध्ये देशात रथयात्रा काढली होती. त्याची जबाबदारी त्यांनी मोदींवर सोपवली होती.
रथयात्रेनंतर मोदींंनी अडवाणींचा विश्वास जिंकला आणि त्यांचे गुजरातमधील राजकारणातील महत्व वाढत गेल्याचे मानले जाते.
अडवाणी यांनी अनेक बाबतीत मोदींना पाठबळ दिले. त्यासाठी त्यांनी दिवंगत अटल बिहारी वाजपेयींवर नाराजी व्यक्त केली होती.
गुजरात दंगलीनंतर वाजपेयींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे त्यांना वाटत होते.
वाजपेयींच्या सल्ल्यावरून अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मोदींचे समर्थन केले होते. याबाबत त्यांनी आत्मचरित्रातही लिहिले आहे.
काही महिन्यांपूर्वीच अडवाणी यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न सन्मान देऊन गौरवण्यात आले. ही मोदींची गुरुदक्षिणा असल्याचे मानले जाते.