वंदे मातरम् गाण्यास नकार देणाऱ्याला शिक्षा करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Roshan More

सुप्रीम कोर्ट

धार्मिक कारणाने तसेच विचारपूर्वक वंदे मातरम गाण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

Supreme Court | Sarkarnama

न्यायालयात आव्हान

वंदे मातरमची सहाही कडवी गाण्यासंदर्भातील नवीन कायद्याला कर्नाटकी गायक टी एस कृष्णा यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

Supreme Court | Sarkarnama

खंडपीठ

या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जाॅयमाल्य बागची, न्या. व्ही मोहना खंडापीठासमोर यावर सुनावणी झाली.

Justice Surya Kant | India’s 53rd Chief Justice | Sarkarnama

धर्मनिरपेक्ष भूमिकेचे उल्लंघन

कृष्णा यांनी आपल्या याचिकेमध्ये वंदे मातरममधील शेवटची चार कडवी ही भारताच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते.

Vande Mataram History

बिजू इमॅन्युअल विरुद्ध केरळ

न्यायालयाने आदरपूर्वक राष्ट्रगीत गाण्यास नकार देण्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले. करत बिजू इमॅन्युअल विरुद्ध केरळ या खटल्याचा दाखला दिला.

Supreme Court | Sarkarnama

न्यायाधीश काय म्हणाले?

न्यायाधीश जाॅमाल्य बागची सुनावणी दरम्यान म्हणाले की, चार कडवी गायची की पाच हे ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र, सद्सद्विवेकबुद्धीने विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षात्मक परिणामांना समोरे जावे लागू नये.

joymalya-bagchi | sarkarnama

शिक्षेची काय तरतूद?

केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार राष्ट्रगीत, राष्ट्रगीत सदृश गीतीचे गायन रोखणाऱ्या किंवा त्यामध्ये व्यक्तय आणणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारवास वं दंडात्मक शिक्षा होऊ शकते.

Court order | Sarkarnama

आकडेवारी सांगून मोदी सरकारला अडचणीत आणणारे सुभाषचंद्र गर्ग कोण?

येथे क्लिक करा