सरकारनामा ब्यूरो
अतहर आमिर खान हे देशातील सर्वात 'हँडसम आयएएस' अधिकारी आहेत. 2016ला UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. सध्या ते श्रीनगर निगमच्या सीईओ पदावर कार्यरत आहेत.
अतहर आमिर खान यांनी काश्मीरच्या डाॅक्टर मेहरीन काझी यांच्याशी 2022ला लग्न केले. हे दाम्पत्य सोशल मीडियावर खूप फेमस आहेत.
IAS अतहर यांचे इंस्टाग्रामवर 6.94 लाख इतके फॉलोअर्स आहेत तर, पत्नी मेहरीन काझी यांचे इंस्टाग्रामवर 4.59 लाख फॉलोअर्स आहेत.
8 महिन्यांपूर्वी हे दाम्पत्य पालक झाले. या क्यूट बाळाचे फोटो ते आपल्या सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात.
काही दिवसाआधी डॉ. मेहरीन यांनी पती अतहर आणि मुलगा अहान यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
त्यांच्या फोटोंवर अनेक फॉलोअर्सने कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यात एकाने कमेंट केली की, 'वडील आणि मुलगा दोघेही सेम दिसत आहेत' तर दुसऱ्याने लिहिले, 'मला अहानचा क्यूटनेस खूप आवडला.'
एका फोटोमध्ये, IAS अतहर यांनी मुलगा अहानसह काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे. आणि हाच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये, IAS अतहर त्यांच्या मुलगा अहानसोबत खेळताना दिसत आहेत.