Rashmi Mane
अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. मतमोजणीच्या फेऱ्यांना सुरुवात झाली आहे.
हरियाणातील 90 आणि जम्मू-काश्मीरमधील 90 विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते.
हरियाणात 10 वर्षे झाली भाजपची सत्ता आहे आणि कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होत आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का निवडणुकीत दोघांना समान मते मिळाल्यास विजयी उमेदवार कसा ठरवला जातो?
बऱ्याचदा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. या स्थितीबाबत कायद्यात एक तरतूद करण्यात आली आहे. अनेक वेळा हा विशेष नियम वापरला गेला आहे.
या परिस्थितीत कायद्याच्या कलम 102 नुसार निर्णय घेतला जातो आणि लॉटरीद्वारे निकाल जाहीर केला जातो.
दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास नाणेफेक केली जोते आणि त्या आधारे उमेदवार विजयी घोषित केला जातो. ते फक्त एक मत म्हणून गणले जाते.
विशेष म्हणजे याआधीही अनेकदा असे बऱ्याचदा घडले आहे की, नाणेफेकीच्या आधारे उमेदवाराचा विजय निश्चित केला गेला.
आसाममध्ये 2018 मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता. तब्बल 6 ठिकाणी अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा लागला होता. 2017 मध्ये, मथुरा कॉर्पोरेशन निवडणुकीतही एका प्रभागावर असाच निर्णय घेण्यात आला होता.