Mayur Ratnaparkhe
देशातील लाखो तरुणांनाप्रमाणे मोईने आयएएस बनण्याचं स्वप्न पाहीलं. पण ते सत्यातही उतरवलं.
हालाकीच्या परिस्थितीसमोर हार न मानता मोईनने चिकाटीने अभ्यास केला आणि यश मिळवलं.
मुरादाबादच्या डिलारी गाव जटपुरा या गावचे रहिवासी आहेत मोईन, अनेक अडथळे पार करून त्यांनी हे यश मिळवलं.
मोईन यांचे वडील बस चालक आहेत आणि आई गृहीणी आहेत.
मोईन हे पाच बहीण- भावंडांपैकी दुसऱ्या नंबरचे आहेत.
मोईनने २०१६मध्ये गावातच छोटासा सायबर कॅफे सुरू केला होता.
सायबर कॅफेतून मिळणाऱ्या पैशांवर मोईन आपल्या कोचिंगची फी भरत असत.
गावात तीन वर्षे सायबर कॅफे चालवल्यानंतर मोईनने अभ्यासासाठी 2019मध्ये दिल्ली गाठली होती.
मोईनला सुरूवातीस सलग तीनदा अपयश आले परंतु चौथ्या प्रयत्नात तो शेवटी आयएएस झालाच.