Rajanand More
काँग्रसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविषयीच्या कथिक स्टिंग ऑपरेशनने राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणात पक्षातीलच एका महिला नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सिध्दरामय्या यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारमध्ये कृपा अल्वा यांच्यावर स्टिंग प्रकरणात असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अल्वा यांची चौकशी सुरू केली आहे.
काँग्रेस पक्षाने अल्वा यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तुमच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सिध्दरामय्या यांच्यावर एका महिलेशी लैंगिक गैरवर्तनाशी संबंधित कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ २०२३ मध्ये चित्रित केल्याचा दावा केला जात असून घटनेचा संबंध २०११ मधील असल्याची चर्चा आहे.
कृपा अल्वा या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना २०१५ ते २०१८ या काळात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाही होत्या.
सामाजिक कार्य तसेच रिअल इस्टेटमध्ये असलेले अमर अल्वा यांची १९९२ मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्यावर वयाच्या २६ व्या वर्षीच कुटुंबाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनीही सामाजिक कार्य सुरू केली.
सामाजिक कार्य करत असतानाच कृपा यांनी राजकारणात काँग्रेसच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यांना पक्ष संघटनेत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. राज्य प्रचार समितीच्या समन्वयक म्हणूनही त्यांनी केले.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरसह अन्य काही विधानसभा मतदारसंघांतून त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले होते. त्यांना एकदाही संधी मिळाली नाही. तिकीटासाठीच त्यांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप सिध्दरायय्या यांच्या पुत्र मंत्री यतींद्र यांनी केला आहे.