Rajanand More
नितीश कुमार यांनी नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली. मागील अनेक वर्षे ते भाजपसोबत बिहारमध्ये सत्तेत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत बिहारच्या विकासावर खूप चर्चा झाली. पण उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आता नितीश कुमार यांना आरसा दाखवला आहे.
गोयंका यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत भारतातील विविध राज्यांमधील लोकांचे मासिक सरासरी वेतन दिले आहे. फोर्ब्स अडव्हाझर इंडियाची ही आकडेवारी आहे.
आकडेवारीनुसार वेतनाच्या यादीत बिहार सर्वात खाली आहे. बिहारमधील लोकांचे सरासरी मासिक वेतन केवळ १३ हजार ५०० रुपये एवढेच आहे.
यादीत महाराष्ट्राने दुसरे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातील लोकांचे वेतन ३२ हजार रुपये महिना आहे. बिहारला इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतील.
रिपोर्टनुसार भारतातील सर्व राज्यांचे सरासरी मासिक वेतन २८ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील लोकांचे वेतन अधिक आहे.
यादीत कर्नाटकचा दबदबा आहे. येथील लोकांचे वेतन सुमारे ३३ हजार रुपये आहे. आयटी हब, संबंधित कंपन्या तसेच स्टार्टअप अधिक असल्याने येथील वेतन अधिक आहे.
बिहारमध्ये अजूनही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसते. राज्यात उद्योगवाढही मोठ्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत स्थलांतर होते.