Harsh Mahajan Profile : हिमाचल प्रदेशच्या राजकारणातील 'चाणक्य'; कोण आहेत हर्ष महाजन?

Rashmi Mane

हर्ष महाजन यांचे नाव चर्चेत

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपचे हर्ष महाजन चर्चेत आहेत.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव

हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव केला.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

काँग्रेसच्या सहा आमदारांनी

काँग्रेसच्या सहा आमदारांनी हर्ष महाजन यांच्या बाजूने मतदान केले. त्यांना तीन अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाला.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

सरकार अल्पमतात

हर्ष महाजन यांच्या विजयाने मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांच्या अडचणी वाढल्या. सरकार अल्पमतात असल्याचा भाजपचा दावा आहे.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

हर्ष महाजन काँग्रेसमध्ये

भाजपमध्ये येण्यापूर्वी हर्ष महाजन काँग्रेसमध्ये होते. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे माझे गुरू असून मी बराच काळ काँग्रेसमध्ये राहिलो, असे हर्ष महाजन सांगतात.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

माजी विधानसभा अध्यक्ष पुत्र

चंबा येथे जन्मलेले हर्ष महाजन हे हिमाचलचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री देस राज महाजन यांचे पुत्र आहेत.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

ते तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री होते. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

काँग्रेसमध्ये सुरुवात

त्यांनी राष्ट्रीय राजधानीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यापूर्वी 1986 ते 1995 दरम्यान हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

पहिल्यांदा आमदारकी

हर्ष महाजन हे 1993 मध्ये पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 आणि 2003 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

Harsh Mahajan Profile | Sarkarnama

Next : 'हरे राम, कृष्ण-कृष्ण हरे'च्या गजरात रंगली जर्मन गायिका, PM मोदींनी धरला ठेका...

येथे क्लिक करा