Vijaykumar Dudhale
राष्ट्रीय साखर सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकार साखर संघ भाजपच्या ताब्यात आला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
हर्षवर्धन पाटील हे देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे हर्षवर्धन पाटील हे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच, नीरा भीमा हा तालुक्यातील दुसरा एक कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. शिवाय त्यांचा खासगी साखर कारखानाही आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे सहकारमंत्री म्हणून काम केले आहे.
हर्षवर्धन पाटील हे 1995 ते 2014 पर्यंत इंदापूरचे आमदार होते. विशेष म्हणजे आमदारकीच्या पहिल्या टर्मपासून ते मंत्रीही होते.
राष्ट्रीय साखर महासंघाच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
R
असा आहे चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास